पनवेल मध्ये भव्य लायन कराओके स्टार गायन स्पर्धा संपन्न*





पनवेल दि.१२ (वार्ताहर): लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम आणि टॅलेंट हंट कमिटी तर्फे पनवेल मध्ये प्रथमच लायन कराओके स्टार ही कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा 4 गटात प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात आल्या या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला.



           पनवेल, पेण, अलिबाग, खोपोली,माणगाव येथून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन माजी प्रांतपाल मुकेश तनेजा आणि मोहिनी तनेजा यांचे हस्ते झाले तर अंतिम फेरीत प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल ए के शर्मा आणि विशेष अतिथी म्हणून द्वितीय प्रांतपाल संजीव सूर्यवंशी, रिजन चेअरमन मिलिंद पाटील उपस्थित होते. डिस्ट्रिक्ट पदाधिकारी प्रवीण सरनाईक, नमिता मिश्रा, आलोक मिश्रा, रमाकांत म्हात्रे , संगीता म्हात्रे, के एस पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. अंतिम फेरी साठी 4 गटातील 46 स्पर्धकांमध्ये झाली.




यात वयोगट 18 ते 40 मध्ये प्रथम क्रमांक तेजश्री पवार, 41 ते 60 वयोगटात प्रथम क्रमांक कांचन देशमुख, द्वितीय क्रमांक संजय चाचड, तृतीय क्रमांक प्रसाद विटकर, 61 च्या वरील वयोगटात प्रथम क्रमांक दत्तात्रय ढोले, द्वितीय क्रमांक वर्षा जोशी, लायन सभासद प्रथम क्रमांक ला. देवेंद्र पाटणे, ला. अविनाश राऊत यांनी पटकावला. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरी साठी परीक्षक म्हणून सतीश मोरे आणि रेणुका दलाल यांनी काम पाहिले तर अंतिम फेरीसाठी विवेक भागवत आणि श्रीकांत जोशी यांनी परीक्षण केले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्लबच्या अध्यक्षा स्वाती गोडसे आणि टॅलेंट हंट कमिटीचे सुयोग पेंडसे यांना सरगम क्लबच्या मानदा पंडित, संविदा पाटकर, अलकेश शहा, संजय गोडसे, मधुरा राजीव, सुरभी पेंडसे यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच या वेळी सरगम क्लबचे प्रेमेंद्र बहिरा, धवल शहा, सुनील देशपांडे, जयेश मणियार, प्रदीप भट्टाचार्य आणि पनवेल मधील रसिक संगीत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने