पनवेल दि.१२ (संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत साई बाबा मंदिर जवळ फिर्यादी दुकानांत काम करत असताना अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी यांना खुर्चीने मारहाण करून शिवीगाळ करून गल्ल्यातील १३,५००/- रोख रक्कम जबरीने चोरी केलेबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज वरून सदरचा गुन्हा हा अभिलेखावरील साहिल शंकर धोत्रे ( वय १९ रा.भिंगरी) व प्रथम प्रसाद जाधव (वय.२० रा. नवनाथ नगर झोपडपट्टी) यांनी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. नमूद आरोपित इसमंचा तांत्रिक व गुप्त बातमीदार यांच्या मार्फत शोध घेतला असता ते बस स्टँड परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ सदर ठिकाणी साफळा रचून आरोपित इसम यांना अटक केली आहे. सदरची कारवारी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. (गुन्हे) अंजुम बागवान, स.पो. नि. राजरत्न खैरनार, पो.उप.नि. अभय शिंदे, पो.हवा नितीन वाघमारे,परेश म्हात्रे, पो.ना.प्रवीण मेथे, पो.शि.नितीन कांबळे, प्रसाद घरत, साईनाथ मोकळ यांनी केली आहे.
Tags
पनवेल