कुत्र्याने तोडले पाच जणांचे लचके
रोहा शहरात गेल्या दोन दिवसांत पिसाळलेल्या एका मोकाट कुत्र्याने एकापाठोपाठ एक अशा पाच जणांचे लचके तोडल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना नगरपालिका प्रशासन सुस्त असल्याने नागरिकांत नाराजी आहे
. शहरातील जवाहरनगर परिसरात सलग दोन दिवस मोकाट कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. हल्ल्यात एकामागून एक असे तब्ब्ल पाच जण जखमी झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
थोडे नवीन जरा जुने