पनवेल, दि.8 (संजय कदम) ः पनवेल शहर वाहतूक शाखा यांच्या वतीने पनवेल शहरातील अबोली रिक्षा चालक यांना महिला दिनाचे औचित्य साधून शुभेच्छा दिल्या.
पनवेल शहर वाहतूक शाखा यांचे वतीने उपआयुक्त तिरुपती काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त बोंडे यांचे संकल्पनेतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील शहर वाहतूक शाखा पनवेल व सहकारी महिला व पुरुष अंमलदार यांनी आज पनवेल शहरातील अबोली रिक्षा चालक यांना महिला दिनाचे औचित्य साधून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन वाहतुकीचे नियमन पाळणे तसेच तुम्ही धाडसाने हे काम करत असल्याबाबत शुभेच्छा देऊन योग्य ते मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Tags
पनवेल