सराईत रिक्षा चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड ; तीन गुन्हे आणले उघडकीस

पनवेल दि ०५ (संजय कदम) : पनवेल तालुका हद्दीत रिक्षा चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्या कडून चोरीच्या दोन रिक्षांसह तीन गुन्हे उघडकीस आणले आहे. 
              तालुक्यातील चिंचवली गावात राहणारे रिक्षा चालक नरेश डुकरे यांची ऑटो रिक्षा हि घराच्या समोरील अंगणात उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारी नंतर वपोनि अनिल पाटील, पोनि जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार सुनील कुदळे, विजय देवरे, महेश धुमाळ, पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोष घेत असताना सराईत गुन्हेगार फरहान मोहम्मद हनीफ बुबेरे (वय २५) याची माहिती मिळाली त्यानुसार सदर आरोपीला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले असता त्याने गुन्हयाची कबुली देत चोरलेल्या दोन रिक्षा ज्याची किंमत जवळपास १ लाख ८९ हजार इतकी असून त्या दोन रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत तसेच दोन पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत व एक डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली उघडकीस आणली आहे. या सराईत आरोपीवर आत्तापर्यंत बाजारपेठ पोलीस ठाणे कल्याण, खालापूर पोलीस ठाणे, पेण पोलीस ठाणे, नागोठणे पोलीस ठाणे येथे या पूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुनील कुदळे हे करीत आहेत. 


थोडे नवीन जरा जुने