कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी च्या स्विमिंग पुलात बुडून एका १९ वर्षीय तरुनाचा मृत्यू ..




पनवेल :  दि १९ मे (प्रतिनिधी ) विजय लक्ष्मण भट्ट वय १९ वर्ष  हा तरुण राहणार पंचशील नगर, नवीन पनवेल.  नेहमी प्रमाणे रविवारच्या दिवसी कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी च्या स्विमिंग पूल येथे  पोहण्यास गेला होता.  त्याच्याबरोबर त्याच्या  शेजारी राहणाऱ्या ५ मुलांसोबत गेला होता.  काही वेळ पोहल्यानंतर तो त्या ठिकाणी बुडाला तेथे त्यांचा जागीच मृत्यू झाला  अशा प्रकारे बुडून मृत्यू झाल्याने 



तेथील व्यवस्थापन सुरक्षा गार्ड यांच्या कामावर प्रश्न चिन्ह उठत असून कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी मध्ये  पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मध्ये सुरक्षा च्या दृष्टीने भीतीचे वातावरण पसरले असून, खूप  प्रतिकृल परिस्थितीवर मात करून   चांगले शिक्षण घेतले असून खासगी ठिकाणी नोकरी करत  होता. व  घराचा उदरनिर्वाह करत असे.  याच्या जाण्याने त्याचा एकुलता एक भाऊ अजय लक्ष्मण भट्ट याला मोठा धक्का बसला आहे. 



विजय यांच्या जाण्याने पनवेल कर्नाळा च्या भरवश्यावर स्वीमिंग पूल मध्ये पोहायला शिकन्यासाठी किंवा पोहण्यासाठी  एवढ्या स्वस्त जीव जात असेल तर त्वरित बंद करावा अशी मागणी होत आहे.


या प्रकरणाचा तपास पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली चालू आहे.


थोडे नवीन जरा जुने