समाज सेवेचा वारसा आसलेले जुई कामोठे येथील नारायण घरत यांचे कुटुंब पनवेल मध्ये प्रसिद्ध आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विकास नारायण घरत यांच्या रूपाने हा वारसा पुढे चालू आहे. कैलास घरत व विलास घरत यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यावर लाईट व पाण्याची व्यवस्था केली आहे. सध्या उन्हाची तीव्रता अधीक जाणवू लागली आहे. आणि पुढे भविष्यातही ही तिव्रता वाढण्याची शक्यता आहे.
त्या अनुषंगाने जेष्ठ बंधू कैलास यांच्या वाढदिवसानिमित्त रांजणगाव गणपती च्या दर्शनास येणार्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी पाणपोईचे च्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तहानलेल्याची तहान भागविणे ही आपली संस्कृती आहे. अलीकडे दहा ते वीस रुपयांपर्यंत पाण्याची बाटली रस्त्यावर कुठेही सहज उपलब्ध होऊ लागल्याने तहान भागविण्यासाठी वाटसरूंकडून साध्या पाण्याऐवजी बाटलीबंद पाणी खरेदी केली जात आहे. परंतु ज्यांना बॉटल घेणे शक्य नाही अशा गोरगरीब, सामान्यांचे हाल होत आहेत.
. म्हणून सामाजिक बांधिलकी जपत घरत कुठूंबियांनी रांजणगाव येथे पाणपोईचे भूमिपूजन केले आहे. लवरच स्वच्छ, आरओ प्रमाणित शितल पेयजल गणेशभक्तांना उपलब्ध होणार आहे. घरत कुठूंबियांच्या या उपक्रमाचे पुणे व पनवेल परिसरात कौतुक केले जात आहे.
Tags
पनवेल