मावळ (4K News) 33 मावळ लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेले उमेदवार श्री. लक्ष्मण सदाशिव अढाळगे यांना निवडणुक अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणुकीत दैनंदिन खर्चाचा हिशेब न सादर केल्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या नियुक्त प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणुक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी निवडणूक अधिकाऱ्यास सादर करणे आवश्यक आहे.
33 मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारतीमधील मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांच्या उपस्थितीत पार पाडली या वेळेस निवडणूक खर्च तपासणी प्रमुख अश्विनी मुसळे आणि सहाय्यक सविता नलावडे यांच्या अधिपत्याखाली पार पडली.
या वेळेस त्यांना असे लक्षात आले की अपक्ष उमेदवार लक्ष्मण सदाशिव अढाळगे यांनी निवडणुकीत दैनंदिन खर्चाचा हिशेब सादर नाही केला त्यामुळे त्यांना नोटीस बजावली, नोटिशित पुढे नमूद केले आहे की,
आपण आपल्या दैनंदिन खर्चाची नोंदवही व प्रमाणके प्रतिनिधीने तपासणीसाठी दिनांक ०३ मे रोजी पर्यंत सादर केले नाहीत, आपण आपला खर्च सादर केला नसल्याने आपणास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम ७७ अन्वये खर्चाचे दैनंदिन लेखे ठेवण्यात कसुर केला आहे असे समजण्यात येईल, तसेच नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत आपण खुलासा सादर करावा व पुढील दुसऱ्या तपासणीवेळी सदर निवडणुक खर्चाचे लेखे ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करावा. विहीत मुदतीत खर्च सादर न केल्यास भा. दं. वि. कलम १७१ (१) अन्वये तक्रार दाखल करण्यात येईल तसेच वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तत्काळ रद्द करण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी, असे देखील नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. यांना निवडणुक अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणुकीत दैनंदिन खर्चाचा हिशेब न सादर केल्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या नियुक्त प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणुक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी निवडणूक अधिकाऱ्यास सादर करणे आवश्यक आहे.
Tags
मावळ