कळंबोली ठरणार सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे केंद्र - आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन संपन्न



पनवेल(प्रतिनिधी) कळंबोली मध्ये वारी या सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे निर्माते असणाऱ्या संस्थेची फ्रॅंचाईजी कळंबोली येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.जगतकर्ता इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणाऱ्यांकरता साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ते वारी या निर्मिती कंपनीचे ऑथराईज फ्रेंचायसी पार्टनर आहेत. या शोरूमचे उद्घाटन आज (सोमवार, दि. १७ जून) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांनी जगतकर्ता इंडस्ट्रीजचे संचालकांना यशस्वी वाटचाली करता शुभेच्छा दिल्या तसेच पुनर्वापर युक्त आणि हरित ऊर्जा वापराच्या प्रक्रियेमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
           उद्घाटनानंतर आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणातून ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून पुनर्वापर योग्य ऊर्जा आणि हरित ऊर्जा वापरण्यावर भर दिला जात आहे. पर्यावरणपूरक असणाऱ्या या ऊर्जेच्या वापरामुळे ग्राहकांच्या खिशावरचा भार देखील हलका होणार आहे. सौर ऊर्जा व अन्य हरित ऊर्जा यांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न करत आहेत. फार्म हाऊस, मोकळ्या जागा, इमारतीवरील जागा या ठिकाणी सौर ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया कार्यान्वित केल्यास घरोघरी वीज निर्मिती केंद्र उघडले जाऊ शकतील. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यामध्ये एक करोड पेक्षा जास्त नागरिक अशा स्वरूपाची घरोघरी ऊर्जा केंद्र निर्मिती करण्यास तयार असल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे वीज निर्मिती केल्यास सध्या वीज निर्मितीसाठी लागणारे कोळसा, इंधन यांची देखील बचत होण्यास फार मोठी मदत होईल.जगतकर्ता इंडस्ट्रीजच्या माध्यमातून वारी यांचे सौर ऊर्जा निर्मिती साहित्य पनवेल परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मी कंपनीचे तसेच त्यांचे संस्थापक संचालक नागेंद्रसिंग आणि आशिष सिंग यांचे आभार मानतो.

संचालक आशिष सिंग म्हणाले की सौर ऊर्जा वापर हा ऑन ग्रीड अँड ऑफ ग्रिड प्रकारचा असतो. आम्ही ऑन ग्रीड प्रकारची सौर ऊर्जा निर्माण करण्यावर भर देत आहोत. वास्तविक सौर ऊर्जा निर्मिती करणे सोपे आहे परंतु ही ऊर्जा साठवून ठेवणे अत्यंत कठीण असते. निर्माण केलेली अतिरिक्त सौर ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी केंद्र सरकार मदत करते. साधारण ऊर्जा वापराची मोजतात करण्याकरता वन-वे मीटर असतात. परंतु या सौर ऊर्जा प्रकारात दिल्या जाणाऱ्या आणि घेतल्या जाणाऱ्या विजेची मोजदाद करण्याचे प्रावधान असते. यामध्ये तुम्ही निर्माण केलेल्या विजेतील अतिरिक्त वीज सरकार कडे जमा होते.सरकारकडून तुमच्या गरजेच्या वेळी ही वीज तुम्हाला परत केली जाते.पुन्हा दिल्या जाणाऱ्या विजेची मोजदाद करण्यासाठी नेट मीटर असतात. त्यामुळे ही ऊर्जा पर्यावरण पूरक आहे आणि तुमच्या सध्याच्या विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत करणारे देखील आहे.
       या उद्घाटन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत जगतकर्ता इंडस्ट्रीज चे संस्थापक संचालक नागेंद्र सिंग, आशिष सिंग, शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, पम पाचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील,"वारी" चे फ्रॅंचाईजी मॅनेजर राजेश लाटे, ॲड. रमेश त्रिपाठी, अविनाश पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा, भाजपचे कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते..


थोडे नवीन जरा जुने