महाराष्ट्र टाइम्सचा वर्धापन दिन सोहळा; आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा


पनवेल (प्रतिनिधी) दैनिक महाराष्ट्र टाइम्सचा ६३ वा वर्धापन दिन सोहळा कँलिडोस्कोप अंतर्गत पनवेल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या समारंभाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन महाराष्ट्र टाइम्सला शुभेच्छा दिल्या. 

             महाराष्ट्र टाइम्सच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त कँलिडोस्कोप अंतर्गंत पनवेलच्या फडके नाट्यगृहात रविवारी खलनायिकांसोबत गप्पांचा महाएपिसोड चांगलाच रंगला. टिव्हीवरील मालिकांमध्ये खलनायिका म्हणून नकोशा असलेल्या कलाकारांच्या आयुष्यातील अनेक अंग या गप्पांमधून निवेदक सौमित्र पोटे यांनी उलगडले. अभिनेत्री ऐश्वर्यां नारकर, शीतल क्षीरसागर, अनिता दाते, माधवी निमकर आणि अपूर्वा नेमळेकर यांच्याशी गप्पांचा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अनेक प्रेक्षकांनी आभार मानले.
 खलनायिकांशी गप्पा ही आगळीवेगळी संकल्पना राबविल्याबद्दल अनेकांनी महाराष्ट्र टाईम्सचे कौतुक केले. दरम्यान या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक समीर कर्वे यांनी स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र टाईम्सचे मेट्रो एडीटर प्रविण मुळ्ये, प्रतिनिधी कुणाल लोंढे उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने