कामोठे (4K News) नुकत्याच मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या असून महाराष्ट्र राज्याची प्रतिमा खराब करणाऱ्या आहेत. कमी दिवसापूर्वी अक्षता म्हात्रे अणि काल यशश्री शिंदे ह्यांची हत्या केली आहे. ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी अणि कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने कामोठे पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ह्यांना निवेदन देण्यात आले
अक्षता म्हात्रे अणि यशश्री शिंदे ह्यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून अक्षता ताई अणि यशश्री ताईंच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देऊन व कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे करण्यात आली. असे कॉलनी फोरम अध्यक्ष मंगेश अढाव यांनी सांगितले.
ह्यावेळी कॉलनी फोरम अध्यक्षा लीनाताई गरड, कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्षा जयश्री झा, सामजिक कार्यकर्त्या रंजना सडोलीकर, सचिव बापू साळुंखे,आम आदमी पक्षाचे चिमाजी शिंदे, कॉलनी फोरमचे पदाधिकारी संदिप इथापे, देवानंद बाठे, सचिन खरात,
संदिप लबदे, पंकज पोदुतवार, सुनील आडे,, मिलिंद बलखंडे, अजित चौकेकर, तुषार दळवी, किर्तीकुमार शिंदे, अमित घुटुकडे गीता कुडाळकर, अर्पिता वाणी, श्वेतल भुसारी , उषाकिरण शिंगे, संजीवनी तोत्रे, प्रियांका साठ्ये, अपर्णा गावडे, हरिष बाब्रिया, अजित चौकेकर, अशोक मनवर, ह्यांच्यासह कामोठे शहरातली नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
कामोठे