मुंबई : (4K News) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री.सी.पी.राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल पदावर नेमणूक केली आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रपती भवनातून केली आहे. श्री सी.पी. राधाकृष्णन हे आता श्री.रमेश बैस यांची जागा घेतील. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली होती. श्री.सी.पी. राधाकृष्णन या अगोदर झारखंडचे राज्यपाल होते. लवकरच ते आपला पदभार स्वीकारतील.
Tags
मुंबई