शेकाप कामोठे कार्याध्यक्ष, गौरव पोरवालांचा अनोखा उपक्रम...विद्यार्थ्यांच्या समवेत विविध प्रकारची 150 झाडे लावली..


कामोठे (4K News)शेतकरी कामगार पक्षाचे कामोठ्याचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या माध्यमातून कामोठे येथील लोकनेते दिवा पाटील शाळेच्या आवारात वृक्षारोपण रोपणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी तेथील वृक्ष संवर्धनाची जबाबदारी शाळेतील विद्यार्थ्यांवर दिली. प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक झाड लावून त्यांची काळजी घेण्यास सांगितले. 
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत वृक्षांच्या संरक्षणाची व वृक्षारोपणाची जबाबदारी सर्वांनीच घेतली पाहिजे तसेच पर्यावरणाचे संरक्षण हे पुढील पिढीला समजावे या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती गौरव पोरवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली. तापमान बदलामुळे वृक्षांचे महत्त्व पर्यावरण संवर्धन याविषयी जाणून घेण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली यावेळी आंबा ,चिंच, जांभूळ ,करंज साग ,अशोक, आवळा या प्रकारची 100 झाडे लावण्यात. 
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला याविषयी माजी आमदार बाळा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेका पक्षाच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम होत असून, 
विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होत असल्याने पालक वर्गाकडून देखील उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमाला शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील साहेब ,समाजसेवक गौरव पोरवाल साहेब ,चेअरमन जयदास गोवारी ,कॅप्टन चिरंजीव सिंग, व्हाईस चेअरमन विनायक म्हात्रे, मुख्याध्यापक श्री गावन सर शंकरशेठ मात्रेl,

 ज्ञानदेव म्हात्रे प्रमोद म्हात्रे ,मुकुंद शितोळे कुणाल भेंडे ,सचिन झणझणे, नितीन पगारे, आदीसह शाळेतील शिक्षक वर्ग, कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने