कामोठे (4K News) उरण येथील 22 वर्षीय तरुणी यशश्री शिंदे हीची वेदनादायी हत्या आणि तिच्या मृतदेहाची भयानक विटंबना करणारा क्रूरकर्मा दाऊद शेख याची 7 दिवस पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला दिनांक 07 ऑगस्ट रोजी पनवेलच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.
माननीय न्यायाधीशांनी दाऊद शेख या नराधमाला आणखी 6 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. त्यामुळे 13 ऑगस्टपर्यंत दाऊद पोलिसांच्याच निगरणीत राहणार आहे.
या प्रकरणात अनेक बाबींचा उलगडा होणे अजून बाकी आहे. धारदार हत्याराने यशश्रीच्या शरीरावर वार करून विटंबना करण्यात आली, त्यावेळी वापरण्यात आलेला कोयता पोलिसांना तपासाअंती सापडला आहे.
मात्र यशश्रीचा मोबाईल अत्यंत महत्वाचा पुरावा या प्रकरणात मानला जातोय. अद्यापही यशश्रीचा मोबाईल शोधण्यात पोलीस असफल ठरले आहेत. येत्या काही दिवसात दाऊद शेखकडून आणखी काय माहिती मिळतेय? कोणते नवे खुलासे होताहेत याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Tags
पनवेल