लायन्स पनवेल सरगम तर्फे महाआरोग्य शिबीर संपन्न...

कामोठे (4K News)लायन्स पनवेल सरगम तर्फे महाआरोग्य शिबीर संपन्न.लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे नुकतेच दुधे विटेवरी गृह संकुल, करंजाडे येथे भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मधुमेह, रक्तदाब, नेत्र तपासणी, इ सी जी, विविध प्रकारच्या रक्त तपासण्या आदि अपोलो हॉस्पिटल च्या माध्यमातून करण्यात आल्या. 

या शिबिराचे उद् घाटन डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटर अनूप थरवानी यांचे हस्ते करण्यात आले. या शिबिराला सोसायटी मधील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सरगम क्लबच्या अध्यक्ष मानदा पंडित, प्रेमेंद्र बहिरा, धवल शहा, अलकेश शहा, संजय गोडसे, स्वाती गोडसे, जयेश मणियार, प्रदीप भट्टाचार्य, आदित्य दोशी,ओमकार खेडकर, महेंद्र लोहार, अनिल परमार तसेच दुधे विटेवरी संकुलाचे चेअरमन भैरुलाल जाट आणि पदाधिकारी प्रफुल्ल चौधरी, कुसई , प्रशांत वडके, प्रवीण परमार, निखिल वडेर, सुभाष शिर्के यांनी खूप परिश्रम घेतले.
थोडे नवीन जरा जुने