पनवेल, दि.8 (वार्ताहर) राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार तुर्भे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
निखील रविकांत उपाध्याय (25 रा.तुर्भे) असे या इसमाचे नाव असून रंग गोरा, उंची 5 फुट, केस वाढलेले, चेहरा गोल, डोळे काळे, दाढी वाढलेली असून अंगात सफेद रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, हातात लाल रंगाचा धागा, पायात क्रॉस कंपनीची चप्पल, पाठीवर प्रिन्स कंपनीची छोटी बॅग असून, त्याला हिंदी भाषा अवगत आहे.
व सोबत मोबाईल फोन आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी तुर्भे पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ मो.नं.9970159298 येथे संपर्क साधावा.
Tags
पनवेल