लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक वसा जपला आमदार रवीशेठ पाटील....

पनवेल (प्रतिनिधी) आपल्या खिशातील पैसे खर्च करून समाजोपयोगी कामे करणारे मोजकीच आहेत मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हे सतत आणि अखंडपणे समाजाची सेवा करण्याचे काम करत आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी सामाजिक वसा जपला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी आज खांदा कॉलनी येथे झालेल्या आरोग्य महाशिबिरात केले. 

           लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने (रविवार, दि.०४ ऑगस्ट) १६ वे 'विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर' माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट नियोजनात पार पडला. या महाशिबिराचे उदघाटक म्हणून आमदार रवीशेठ पाटील बोलत होते.

आ. पाटील यांनी पुढे म्हंटले कि, डॉक्टर हे गुणकारी असतात त्यांच्याकडे देवरूपाने पाहिले जातात. सन २००६ पासून कोरोनाचे दोन वर्षे अपवाद वगळता हे महाशिबीर अखंडपणे सुरु आहे. त्याचे नियोजन उत्तम असल्यामुळेच हा उपक्रम अविरतपणे सुरु आहे, त्यामुळे या उपक्रमाला तोड नसून हि सेवा फक्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे या विभागाला मिळाली आहे. नावाने खूप दानशूर होतात पण कर्तृत्वाने खरे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत, असे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सेवेचे व्रत घेतलेच आहे पण त्याचबरोबरीने येथील माणसाला काय आवश्यक आहे याची जाणीवही त्यांच्याकडे आहे, त्याप्रमाणे त्यांच्याकडे कामाचा वसा असून विधिमंडळातील ते एक बुलंद आवाज आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. लोकनेते रामशेठ ठाकूर गरीब कुटुंबात जन्मलेले आहेत आणि याची जाणीव त्यांनी कायम ठेवली आहे आणि तीच जाणीव त्यांच्या कुटुंबात रुजली आहे, त्यामुळे या कुटुंबाकडून नेहमीच चांगले कार्य करत कायम सामाजिक बांधिलकी जपली जात आहे, असेही त्यांनी आमदार रवीशेठ पाटील यांनी अधोरेखित केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून, हे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर, संस्था व त्यांचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे योगदान महत्वाचे ठरले असल्याचे सांगितले आणि त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन त्यांच्याप्रती आभार मानले. अनेकदा कामाचे कौतुक होत असते पण देवाने दिले ते समाजासाठी देणे आपले कर्तव्य आहे, आपणही समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकीला प्रथम प्राधान्य देत असतो असे सांगतानाच वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर असलेले प्रेम कायम वृद्धिगत करा, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले. 

          यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी, महाशिबिराच्या प्रथम ते आजपर्यंतच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. या शिबिरातून लोकांची सेवा करण्याची ताकद डॉक्टर व त्यांच्या संस्था, सहकारी, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामुळे मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वतः आरोग्यदायी राहणे गरजेचे आहे मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आरोग्य तपासणी करत नाही त्यामुळे एखादा आजार झाला तर त्यावेळी केलेल्या तपासणीवेळी आणखी व्याधी लागतात त्यामुळे या व्याधी टाळण्यासाठी वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी गरजेचे आहे. मात्र अनेक लोक विशेषतः ग्रामीण भागातील माणूस दुर्लक्ष करतो त्यामुळे या शिबिरातून त्याची तपासणी होऊन योग्य उपचार देण्यासाठी या शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जात असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात जनआरोग्य योजना तर राज्यात वैद्यकीय सहाय्यता केंद्र सुरु केले आहे. पूर्वी आमदारांनी शिफारस केल्यावर रुग्णांना १५ ते २० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत होती मात्र देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हजाराचे स्वरुप बदलून ती लाखात केली आणि त्या अनुषंगाने मी शेकडो रुग्णांना मोठ्या स्वरूपात मदत करू शकलो, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. वैद्यकीय दृष्टिकोनातून डॉक्टर जनजागृती करतात त्याप्रमाणे ज्येष्ठ डॉक्टर गिरीष गुणे  यांनी सेवाभावी रूपाने काम करून आदर्श निर्माण केला आहे, त्याचप्रमाणे इतर डॉक्टर आणि संस्था काम करीत आहेत. या सर्वांचे नेहमीच सहकार्य लाभतो असे सांगतानाच त्यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले.

       यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून बोलताना प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. गिरीश गुणे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना समस्त डॉक्टर परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पुढे म्हंटले की, या महाशिबिराच्या पहिल्या शिबिरापासून ते आतापर्यंतच्या शिबिरात मी सहभाग घेतला आहे. पहिल्यावेळी चार ते पाच हजार नागरिक लाभ घेत होते ती संख्या आता १२ ते १४ हजाराच्या आसपास गेली आहे. विशेषत्वाने काळानुसार शिबिरात आवश्यक असलेले बदल यात समाविष्ट करण्यात आले त्यामुळे तळागाळातील लोकांची गरज ओळखून त्यांना शिबिराच्या अनुषंगाने उपचार देण्याचे काम होत आहे. कोणताही उपक्रम राबविताना त्यातील नियोजन महत्वाचे असते, आणि तशाप्रकारचे नियोजन या शिबिरात असते त्यामुळे सेवा घेणाऱ्याला जसा आनंद होतो तसा सेवा देणाऱ्यालाही समाधान होतो. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार महेश बालदी यांनी, समाजासाठी सतत काम करणाऱ्या आणि नेहमीच समाजहित जपणाऱ्या अशा सामाजिक कल्याणाचा हा वाढदिवस असल्याचे म्हंटले. फक्त वाढदिवसापुरते नाही कायम सामाजिक उपक्रम हा राबवत असल्याचे यावेळी अधोरेखित केले. वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे आणि नवीन तंत्रज्ञान समाविष्ट करून त्याप्रमाणे उपचार देण्याचे काम डॉक्टर मंडळी करत असतात. या शिबिराच्या माध्यमातून हजारो नागरिक लाभ घेत असतात त्यामुळे स्वास्थ ठीक ठेवण्यासाठी चांगली मदत होत असते. असे सांगतानाच मागील वर्षांपासून आम्ही आदिवासी वाड्यांमध्ये फिरता दवाखाना सुरु केला आहे त्या धर्तीवर जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्रत्येक वाडीवर स्पेशल अभियान राबविण्याची मागणी त्यांनी डॉक्टरकांकडे यावेळी केली.