माडभुवन दरडग्रस्त वाडीचे लवकरच पुनर्वसन होणार आमदार महेश बालदी यांच्या हस्ते ९७ आदिवासी कुटुंबांना प्लॉट चे वाटप....

 पनवेल (4KNews) उरण विधानसभा मतदार संघातील आपटा सारसई येथे माडभुवन ही आदिवासी वाडी आहे. गेल्या पावसाळ्यात येथील ग्रामस्थांनी  डोंगराला मोठ्या भेगा पडल्याचे आमदार महेश बालदी यांच्या निदर्शनास आले होते. इरशालवाडी चे दुःख प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आमदार महेश बालदी यांनी गांभीर्याने शासन प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यास यश मिळाले असून रसायनी पाताळगंगा सारसई परिसरात एम आय डी सी चे जागेत वाडीचे पुनर्वसन करण्याची मंजुरी शासनाने दिली.
 त्यासाठी शासनाकडून ३०० गुंठे जागा एम आय डी सी कडून उपलब्ध करून दिली आहे वाडीतील ९७ कुटुंबांना आमदार महेश बालदी यांच्या हस्ते प्लॉट च्या सनद वाटप करण्यात आल्या असून लवकरच या जागेवर शासनाकडून पुनर्वसन करण्यात येईल असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. यावेळी जि प सदस्य ज्ञानेश्र्वर घरत,ज्येष्ठ कार्यकर्ते संजय टेंबे, माजी सरपंच ज्ञानेश्र्वर भोईर, सरपंच निकिता भोईर, उपसरपंच मयूर शेलार, विद्याधर जोशी, सदस्य असद पिठठु, मारुती चव्हाण, राजेश देशमुख, पांडुरंग लेंडे, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत आणि मोठ्या संख्येने वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने