महाराष्ट्र् राज्यातील वाढते बलात्काराचे गुन्हे रोखणायसाठी राज्यात बलात्कार विरोधी पथकाची स्थापना करणे तसेच महिलांना स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची कामोठे कॉलनी फोरमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

कामोठे (4K News)गेल्या काही महिन्यांमध्ये महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . नवी मुंबईतील अक्षता ताई म्हात्रे , उरणमधील यशश्री शिंदे आणि नुकतेच घडलेले बदलापूर शाळेतील चिमुरड्यां वर झालेला अमानवी अत्याचार असेल ह्या सर्व प्रकरणांमुळे सामान्य जनतेमध्ये असंतोषाची आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील ४ वर्षाच्या बाळापासून ते ७० वर्षाच्या आजीपर्यंत कोणीही सुरक्षित नाही . महाराष्ट्र्र राज्यामध्ये सन २०२३मधे ७५२१ बलात्काराचे गुन्हे नोंदवल्याची माहिती असून सन २०२२ च्या तुलनेत ह्या गुन्ह्यांमधे ६. २% वाढ झाली असून महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी विचारांच्या सुसंस्कृत राज्यासाठी हि शरमेची बाब आहे . राज्य सरकार महिलांवरील अत्याचार रॊखण्यात्त अपयशी ठरत असल्याचे वरील आकडेवारीवरून सिद्ध होते . 


पोलीस प्रशासनाचा नराधमांना धाक राहिलेला नसून पोलीस यंत्रणा बलात्काराच्या घटना रोखू शकलेली नाही . ज्या पद्धतीने दहशतवाद संपवण्यासाठी तसेच दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी "दहशतवाद विरोधी पथक " कार्यरत आहे . त्याच धर्तीवर राज्यातील बलात्कार रोखण्यासाठी "प्रत्येक शहरामध्ये बलात्कार विरोधी पथकाची स्थापना करावी . बलात्काराची घटना घडल्यानंतर खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश देऊन सरकारची जबाबदारी संपत नसून अशा घटनांना प्रतिबंध लावणे सरकारचे काम आहे. ह्या पथकाच्या माध्यमातून टगेखोर , छेडछाड , विनयभंग ,अश्लील शेरेबाजी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करता येईल.
 तसेच हे पथक ज्यांच्यावर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत / तक्रारी प्राप्त झाल्या आहेत अशा लोकांवर नजर ठेवून असेल . महिलांना जर एखाद्याची तक्रार करायची असल्यास पथकाच्या माध्यमातून विना विलंब तक्रार नोंदवता आली पाहिजे. तसेच मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिल्यास बलात्कार विरोधी पथकाच्या मागणी विषयी अजून सविस्तर चर्चा करून ह्या पथकाची आवश्यकता पटवून देऊ अशी ग्वाही कामोठे कॉलनी फोरम अध्यक्ष मंगेश आढाव ह्यांनी दिली.
तसेच राज्यातील महिलानांवरील वाढते अत्याचार बघता राज्य सरकार आपले रक्षण करू शकत नसल्याची भावना महिला वर्गात निर्माण झाली आहे . त्यामुळे आपल्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी इतर कोणावरही अवलंबून न राहता आपले रक्षण आपणच करायला पाहिजे असा विचार आमच्या बहिणींच्या मनात येत आहे.सरकारने तातडीने महिला आत्मसन्मान योजना राबवून ह्या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना आत्मरक्षणासाठी राज्य सरकार कडून शस्त्र परवाना तसेच सरकारी खर्चातुन शस्त्र प्रशिक्षण तसेच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची मागणी मंगेश आढाव ह्यांनी केली. जेणेकरून महिला अतिप्रसंगाच्या वेळी अबला न राहता आपल्याकडील शस्त्र आणि प्रशिक्षणाच्या सहाह्याने अशा नराधमांना चांगलीच अद्दल घडवेल . 
 आज कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने कामोठे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजय कांबळे ह्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ह्यावेळी कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव, महिला अध्यक्षा जयश्री झा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रंजना सडोलीकर, कामोठे कॉलनी फोरमचे पदाधिकारी बापू साळुंखे , देवानंद बाठे , गीता कुडाळकर, शुभांगी खरात, श्वेतल भुसारी, अर्पिता वाणी, राघवेंद्र गट्टेवार, प्रवीण भालतडक, सुनिल आडे, अश्विनी सूर्यवंशी, पंकज पोदुतवार, उषाकिरण शिंगे, संदीप लबडे, शीतल दिनकर, सुप्रिया माने, संजीवनी तोत्रे उपस्थीत होते.
थोडे नवीन जरा जुने