पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

एकात्मता, मानवतावाद आणि अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रप्रेमी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.  साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता.
 शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.

 त्यांना जयंतीनिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, शहर सरचिटणीस अमित ओझे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, के.सी. पाटील गुरुजी, सुरेश वास्कर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.  

थोडे नवीन जरा जुने