"महेश बालदिंचे समर्थक ठाकूर कुटुंबीय शेकाप मध्ये!"
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू होईल. रायगड मधील उरण विधानसभा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणी होणारी लढत ही अत्यंत चुरशीची होणार आहे असे बोलले जाते. आपला असलेला गड राखण्याच आवाहन भाजप समर्थक आमदार श्री.महेश बालदी यांच्यासमोर राहणार आहे. तर आपण गेल्या पंधरा वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत केलेल्या सामाजिक,अध्यात्मिक,शैक्षणिक,रोजगार निर्माण अशा अनेक कार्याच्या जोरावर पुन्हा विधानसभा खेचून आणण्यासाठी शेकाप चे रायगड जिल्हा खजिनदार श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे संपूर्ण ताकदीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण उरण विधानसभा पिंजून काढत आहेत.
उरण विधानसभा क्षेत्रात नेहमीच तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज धुतुम येथील महेश बालदी यांचे अत्यंत जवळचे आणि भाजपचे अध्यक्ष श्री. रोशन ठाकूर यांनी त्यांचे वडील श्री.रामशेठ ठाकूर यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबीय आणि मित्र-परिवारा सोबत मा.आमदार श्री. बाळाराम पाटील आणि शे.का.प. नेते पनवेलचे मा.नगराध्यक्ष श्री.जे.एम.म्हात्रे यांच्या उपस्थितीत श्री.प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
यावेळी बोलताना शेकाप नेते श्री.ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले की प्रत्येक वेळी पक्ष प्रवेश करताना सगळेजण स्वतःसाठी काही मागणी ठेवतात आणि प्रवेश करतात यावेळी सुद्धा ठाकूर कुटुंबीयांनी महेश बालदी यांना आमदार या पदावरून पायउतार करण्याची मोठी मागणी केली आहे
त्यासाठी आम्ही दिवस-रात्र एक करू आणि भरघोस मतांनी श्री.प्रितमदादा म्हात्रे यांना निवडून आणू ही मागणी त्यांनी केली याचा आम्हाला सांगायला अभिमान वाटतो. यावेळी प.पं.स. मा.सभापती श्री.काशिनाथ पाटील कृ.उ.बा.स. सभापती श्री.नारायणशेठ घरत,उरण विधानसभा चिटणीस श्री.जितेंद्र म्हात्रे,ज्येष्ठ पत्रकार श्री.माधव पाटील, पनवेल जिल्हा चिटणीस श्री.गणेश कडू, विभागीय चिटणीस विलास फडके, चिटणीस श्री राजेश केणी, उपस्थित होते.
Tags
पनवेल