पनवेल शहरामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस ताकतीने वाढत असताना कामोठे परिसरातील शिवसेनेच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या सौ नंदाताई काथारे यांचा भव्य प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव सरचिटणीस शिवदास कांबळे व पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार पाटील यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशाने आज कामोठे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात भव्य प्रवेश देण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला अध्यक्ष सौ प्रज्ञा चव्हाण होत्या तर हा पक्ष प्रवेश व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केलेले श्री अक्षय पाटील व जयसिंग पाटील यांच्यासह जिल्हा युवक अध्यक्ष श्री मंगेश नेरुळकर. युवती जिल्हाध्यक्ष स्मिता सोनवणे,
(महिला जील्हा उपाध्यक्ष अश्विनीताई भोसले, महिला जिल्हा उपाध्यक्ष रचनाताई कदम, महिला जिल्हा सरचिटणीस रेखा काकू दांडेकर, महिला जिल्हा सह चिटणीस वंशिका पडवळ, महिला सहचिटणीस स्नेहल गुरव , खारघर शहर महिला अध्यक्ष उषाताई बडोदे, महिला जिल्हा सचिव मायाताई दांडेकर, महिला जिल्हा सचिव शोभाताई जाधव या महिला पदाधिकारी ,
यांच्या समवेत सौ नंदा ताई यांच्याबरोबर प्रवेश केलेल्या शेकडो कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
महिला प्रदेश उपाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या अनुमतीने सौ नंदाताई यांची पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येऊन त्याला नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महिलांसाठीच्या योजना आणि विशेषता महिला व बालकल्याण विभागाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती या सभेमध्ये देण्यात आली
कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आमदार आदिती तटकरे यांचे मनापासून सर्व महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व्यवस्थितपणे राबवून महिलांच्या खात्यात पैसे पोचवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले
शिवदास कांबळे राजकुमार पाटील व महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना प्रवेशित सर्व कार्यकर्त्या महिला भगिनींना पक्षातर्फे आदर सन्मान देऊन योग्य प्रकारे त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे पक्षाच्यावतीने आश्वासन दिले
Tags
पनवेल