पनवेल (प्रतिनिधी) कामोठे येथील भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक ०३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०६ वाजता कामोठे येथे ५०० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने यावेळी हॅप्पी सिंग यांचा अभिष्टचिंतन सोहळाही होणार आहे.
कामोठे शहरातील सेक्टर ६ मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक महिलांचा साडी तर पुरुष ज्येष्ठ नागरिकांचा शर्ट पॅन्ट पीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध भेटवस्तू असलेला लकी ड्रॉ सुद्धा असणार आहे, अशी माहिती वॅल्यू ऑफ स्माईल फाऊंडेशनच्या संस्थापक हरजिंदरकौर सिंग यांनी दिली आहे.
Tags
पनवेल