जयपूर फूट शिबिराच्या माध्यमातून ७० दिव्यांगांना आधार



पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन, फिनोलेक्स केबल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जयपूर फूट शिबिराच्या माध्यमातून ७० दिव्यांगांना आधार मिळाला आहे. 


         मोफत कृत्रिम हात व पाय अर्थात जयपूर फूटसंदर्भात लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट महिन्यात शिबिर झाले होते. या शिबिरात हात, पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून त्या अनुषंगाने कृत्रिम हात, पायासाठी मापे घेतली गेली होती. अशा व्यक्तींना हे कृत्रिम अवयव रविवारी पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात बसविण्यात आले.
      श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास माजी नगरसेवक अरुणकुमार भगत, भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, जयपूर फूट प्रोजेक्ट हेड मिलिंद जाधव, साधू वासवानी मिशनचे प्रतिनिधी डॉ. सलील जैन, सुशील ढगे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन कॉर्डिनेटर डॉ. सचिन जाधव, मंडळाचे कार्यालयीन सचिव अनिल कोळी, श्याम पुंडे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने