पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा (एचएचबीए) चा दिवाळी मिलन 2024 हा समारंभ उलवे येथील श्री रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी इंडिया सिमेंटच्या माध्यमातून उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या सिमेंटच्या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
या कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष शंकर म्हात्रे, महासचिव तुकाराम दुधे, खजिनदार बाळासाहेब देशमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Tags
पनवेल