कामोठे येथील शिवसेनेला बळकटी शेकडो पुरुष व महिलांचा शिवसेनात प्रवेश!

कामोठे येथील शिवसेनेला बळकटी शेकडो पुरुष व महिलांचा शिवसेनात प्रवेश!
माझ्या मार्गदर्शनाखाली, कामोठे शहरप्रमुख श्री. सुनील गोवारी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामोठे चे मा. शहर प्रमुख श्री. कमलाकर गायकर यांचा सह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश आज दि.२८/१०/२०२४ रोजी सायं. ४ वाजता, कराडी समाज हॉल सेक्टर १४ कामोठे येथील पार पडला .
पनवेल परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकुशलतेवर प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. कामोठे शहरातील शेकडो पुरुष व महिलांनी हातात भगवा झेंडा घेऊन सेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
 मी सर्वांचे स्वागत करून आगामी काळात सर्व पुरुष व महिला कार्यकर्त्यांना मान आणि सन्मान दिला जाईल. त्याचबरोबर त्यांना पक्षाकडून उचित जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगितले व त्यांच्या सर्वांचे स्वागत देखील केले. यावेळी पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, पनवेल महानगर संघटक सुलक्षणा जगदाळे, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, कळंबोली शहर संघटक श्रीकांत फाळके  यांच्यासह शेकडो शिवसैनिक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने