पनवेल(प्रतिनिधी) विजयाची हॅट्रिक करून आता विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (सोमवार, दि. २८) उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्याकडे दाखल केला.
यावेळी महायुतीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व समाज बांधवांचा जल्लोषात सहभाग होता. विशेष म्हणजे आज शक्तीप्रदर्शन हा विषयच नव्हता, मात्र हजारॊ कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन आपला जल्लोष ढोलताशाच्या गजरात दाखवून दिला आणि त्याचे रूप शक्ती प्रदर्शनात रूपांतरित झाले होते.
पनवेलच्या विकासाला गती आणि दिशा देण्याचे काम कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. सामान्य कार्यकर्ता ते आमदार पण कोणताही बडेजाव नाही. साधी राहणी, लोकांच्यात सातत्याने वावरणारे आणि पनवेलच्या विकासाचा महामेरू असे व्यक्तिमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर परिचित आहेत. त्यांचा अर्ज दाखल करताना युवा, महिला, ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जागोजागी उत्स्फूर्त स्वागत होत असताना विजयी भव असा आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळत होता.
यावेळी 'महायुतीचा विजय असो, 'एकच वादा प्रशांतदादा', 'प्रशांतदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है', अशा गगनभेदी घोषणांनी पनवेल दुमदुमला होता. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि लोकप्रतिनिधी, हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय येथून निघालेली रॅली शहरातून प्रांत अधिकारी कार्यालय येथे पोहोचली. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या संग्राम निवासस्थानी जाऊन दिबासाहेबांना अभिवादन केले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, गोवा राज्याचे आमदार दयानंद सोपटे, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल विधानसभा प्रमुख व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी नगरसेवक हरेश केणी,शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, परेश पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, सुनील घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भीमसेन माळी, शिवदास कांबळे, सुरेश फडके, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, आरपीआयचे नेते प्रभाकर कांबळे, मोहन गायकवाड, भाजप खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मागील तीनही विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारली असून यावेळीही प्रचंड मताधिक्याने विजय मिळेल अशी खात्री पनवेल मतदार संघातील मतदार नागरिक देत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात केलेल्या कामांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला आहे. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा आणि दांडगा जनसंपर्क असलेले सर्वसामाजाचे प्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. सर्वांगिण आणि शाश्वत विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने मोठे योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांना सर्व समाजात मानणारा वर्ग मोठा आहे. यावेळीही मोठा विजय असावा अशी संपूर्ण मतदार संघातील जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते आणि सर्व समाजातील नागरिक सज्ज झाल्याचे स्पष्ट चित्र आज अर्ज दाखल करताना दिसत होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ, बबन मुकादम, चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, महिला मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यांचीही भाषणे झाली. त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी सर्वानी सज्ज राहू या, असे आवाहन केले.
Tags
पनवेल