त्या 5 कोटींबाबत पोलिसांनी दिली महत्वाची बातमी



विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात पुण्यातील खेडशिवापुर टोल नाक्यावर सोमवारी संध्याकाळी पाच कोटी रुपयांसह एक कार राजगड पोलिसांनी पकडली. 

या कारमधील चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची नावे सागर सुभाष पाटील, रफीक अहमद नजीर, बाळासाहेब आण्णासाहेब आसबे, आणि शशिकांत तुकाराम कोळी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ही रक्कम सांगोल्यातील कंत्राटदार बाळासाहेब आसबे यांची आहे. निवडणूक आयोगाला याची माहिती देण्यात आली असून, सर्व रक्कम ट्रेझरीमध्ये जमा करण्यात आली आहे.




थोडे नवीन जरा जुने