31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी करा, अन्यथा रेशन धान्य बंद



सर्व रेशनकार्डधारकांना 'ई-केवायसी' बंधनकारक करण्यात आली आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने याचे निर्देश दिले आहेत. ई-केवायसीसाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

 शिधापत्रिकाधारकांने 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी केली नाही, तर त्यांना रेशन धान्य मिळणार नाही. याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार आहेत, त्यामुळे रेशन दुकानात जाऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता.


थोडे नवीन जरा जुने