महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची यादी जाहीर होताच महाविकास आघाडी आणि महायुतीत बंडखोरी सुरू झाली आहे. पुण्यातील हडपसर मतदारसंगात मविआला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हडपसर मतदारसंघ शरद पवार गटाला गेल्याने ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर नाराज झाले आहेत
. त्यामुळे ते आज मेळावा घेत अपक्ष लढण्याची घोषणा करणार आहेत. तसेच, अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल करत शक्ती प्रदर्शन करणार आहेत. आज कोडव्यात त्यांचा निर्धार मेळावा होणार आहे. यामुळे येथे मतांची विभागणी होऊन महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे.
Tags
पूणे