नवी मुंबईः त्या दर्यावर होणार कारवाई, सिडकोचे आश्वासन


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 'शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा'च्या (सिडको) जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाला, तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे
. हे सर्वं अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पुन्हा एकदा सिडको प्रशासनाकडे केली. त्यावर अनधिकृत बांधकामावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन सिडकोच्या वतीने देण्यात आले. 
थोडे नवीन जरा जुने