पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना शासनातर्फे सन्मानित केल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती (अधिकृत) यांनी केला विशेष सत्कार




पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः  माणगांव येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना वचनपुर्ती सोहळा  कार्यक्रमामध्ये पनवेल महानगरपालिकेच्यावतीने महिला सक्षमीकरण अभियानाच्या प्रभावी अमंलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री कु.अदिती तटकरे , खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन आयुक्त मंगेश चितळे यांना सन्मानीत आले.




या गौरवाबद्दल आज पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती (अधिकृत)चे अध्यक्ष सुनिल पोतदार, कार्याध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष अनिल कुरघोडे सचिव रविंद्र गायकवाड, सहखजिनदार सोनल नलावडे, संघटक गौरव जहागीरदार व संपर्कप्रमुख संतोष सुतार, सदस्य संजय कदम, सुनिल वारगडा आदींनी त्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचा विशेष सत्कार केला. त्याचप्रमाणे पनवेल शहरातील नव्याने सुरू असलेल्या विकास कामाबद्दल तसेच पत्रकारांना येत असलेल्या अडीअडचणी संदर्भात साधक-बाधक चर्चा यावेळी करण्यात आली. 

याप्रसंगी आयुक्त मंगेश चितळे यांनी पत्रकारांना पूर्णतः सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.


थोडे नवीन जरा जुने