पनवेल/प्रतिनिधी : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती (अ) ची नवीन कार्यकारणी पनवेल येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. यावेळी सर्वानुमते ज्येष्ठ पत्रकार सुनिल पोतदार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्याचबरोबर कार्याध्यक्षपदी संतोष भगत, उपाध्यक्षपदी अनिल कुरघोडे व दिपाली पारसकर, सचिवपदी रविंद्र गायकवाड, खजिनदारपदी दिपक घोसाळकर, सहखजिनदारपदी सोनल नलावडे, संघटकपदी गौरव जहागीरदार व संपर्कप्रमुख म्हणून संतोष सुतार यांची निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदी निवड.
झाल्यानंतर सुनिल पोतदार यांनी सांगितले की, पत्रकारांच्या तसेच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना असून प्रत्येक पदाधिकारी तसेच सदस्याने सचोटीने काम करुन समितीचा विस्तार करण्यास हातभार लावावा.
यावेळी संजय कदम, सुनिल वारगडा, सनिप कलोते आदी सदस्य उपस्थित होते. तर यावेळी उपस्थित राहू न शकलेले अरविंद पोतदार, राकेश पितळे, हरेश साठे आदी सदस्यांनी दूरध्वनीद्वारे आपला पाठींबा दर्शविला.
Tags
पनवेल