पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर पाठिंबा

पनवेल (प्रतिनिधी) पीपल्स रिपब्लिकन पार्टीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

 या पाठिंब्याचे पत्र पीआरपीचे रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे आज (शुक्रवारी) सुपूर्द केले. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे पनवेल मतदारसंघात भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे
. पीपल्स रिपब्लिकन पार्टी महायुतीतील घटक पक्ष असून पनवेल मतदारसंघातील पीआरपीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचे काम करणार असल्याचे या पाठिंबापत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्र देताना पीआरपीचे तालुका अध्यक्ष विद्यानंद जाधव हेही उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने