अहमदनगरमधील भाजपचे सुजय विखे पाटील यांचे धांदरफळ येथील कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरातांबद्दल गलीच्च विधान केले. यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस कार्यकत्यांनी पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले
. जयश्री थोरात यांच्यासह दुर्गा तांबे देखील ठिय्या आंदोलनात सहभागी होत्या. रात्री दहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरु होते, अखेर चारही गुन्हे दाखल झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.