पनवेल, दि.1. आज कामोठे शहरांतील, दिवाळी निमित्त सेक्टर 34 येथे क्टिव सिटिझन काऊन्सिल व सेक्टर 34 येथिल सोसायटी यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्या शहरातील सर्व स्वच्छता दूत, आरोग्य कर्मचारी, धूर फवारणी व ईतर सर्व कर्मचारी बांधव यांना दिवाळी भेट वस्तू तसेच दिवाळी फराळ , मिठाई वाटप करुन देश हिताचा, सर्वांच्या एकीचा,बांधिलकी जपण्याचा संदेश यातून दिला.
शहरातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी, महानगरपालिका व लोकप्रतिनिधी म्हणून हे सर्वजण नेहमी तत्पर व सज्ज आहोत असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी उपक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यसम्राट मा.नगरसेवक विकास घरत, डॉ. सखाराम गारळे, युवा मोर्चा उपाध्यक्ष .
राहुल बुधे, आदित्य भगत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना मगदूम कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र पाधी, विजय सरगर, सुशांत काटकर, भूषण यादव, चंद्रकांत यादव, चंद्रकांत खोसे व सर्व सोसायटींच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
पनवेल