आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...



पनवेल (4Knews )पनवेल विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार 
 आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रचारात मोठी बाजी मारली आहे. 

पनवेलचा विकासात परिवर्तन करण्याचे काम कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. पनवेल शहराचा विकास होताना त्यांनी ग्रामीण भागातही विशेष लक्ष घातले. १५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात सार्वजनिक सुविधा बघायला मिळत नव्हते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर पनवेलचा झपाट्याने विकास झाला. त्यामुळे प्रचारादरम्यान जागोजागी त्यांचे जोरदार स्वागत केले जात असून महिलांकडून त्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा आणि ज्येष्ठांकडून भरभरून आशिर्वाद दिला जात आहे. 

 संपादक  : गौरव जहागीरदार 
9967447111

थोडे नवीन जरा जुने