पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले हे आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार पुढील प्रेरणादायी ठरावे यासाठी पनवेलमधील कट्टा परिवाराच्या वतीने पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. कट्टा परिवाराचा हा उपक्रम राबवण्याचा यंदाचे पाचवे वर्ष आहे. या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन कट्टा परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले.
विरूपाक्ष मंदिरासमोर कट्टा परिवार पनवेलतर्फे 2020पासून अनेक तरुण मुलमुली मिळून किल्ला बनवण्याची परंपरा जोपासत आहेत. त्यानुसार याही वर्षी कट्टा परिवार तर्फे पन्हाळा किल्ला उभारण्यात आला आहे. ह्यासाठी विशेष मेहनत अथर्व गोखले, तन्मय समेळ, सुमेध गाडगीळ यश जोशी ह्याच्यासह कट्टा परिवारातील सदस्यांनी घेतले.
दरम्यान, कट्टा परिवारातील सदस्य सिद्धेश गोडबोले ह्याच्या मातोश्रींचे नुकतेचह निधन झाल्याने यंदा आकर्षक सजावट न करण्याचे आणि थोडक्यात किल्ला बनवून छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदर व्यक्त करण्यात आला तसेच पुढीलवर्षी अजून चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात कट्टा परिवार नवीन किल्ला घेऊन तो साकारण्याचा प्रयत्न करेल असा निर्धार केला. या वेळी श्रीनंद पटवर्धन, पत्रकार संजय कदम, उमेश इनामदार यांच्या कट्टा परिवारातील सदस्य उपस्थित होते.
Tags
पनवेल