स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आज पनवेल आणि उरण चा दौरा केला .


 स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आज पनवेल आणि उरण चा दौरा केला .
या प्रसंगी त्यांनी आपल्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या व सर्वांना सांगितले की येत्या सहा नोव्हेंबर रोजी महेश साळुंखे आपला पाठिंबा कोणाला याविषयी जाहीर वक्तव्य करणार आहेत. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा पनवेल उरण मध्ये नियमित सतत वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. 

 त्यामध्ये महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात .त्याचप्रमाणे एक जानेवारीला नाशिक येथे वीस मार्चला महाड येथे सहा डिसेंबरला मुंबई येथे असे वर्षभर विविध ठिकाणी  जाहीर सभेचे आयोजन करतात . महेश साळुंखे पूर्ण वर्षभर पनवेल उरण मध्ये सक्रिय असतात त्यामुळे त्यांना फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून पाठिंबा मिळत असतो . आगामी उरण पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाबरोबर चर्चा चालू आहे . 


गेली पंधरा दिवस याविषयी चर्चा चालू आहे परंतु योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यामुळे येत्या सहा नोव्हेंबरला महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा का महायुतीला पाठिंबा द्यायचा याविषयी महेश साळुंखे निर्णय घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना कळवणार आहेत . महेश साळुंखे यांचे महाविकास आघाडी त्याचबरोबर महायुतीतील कार्यकर्त्यांची चांगले संबंध आहेत.  जो प्रथम सन्मानपूर्वक मान देईल त्याच पक्षाला पाठिंबा जाहीर केला जाईल.  महाविकास आघाडी की महायुती याचा निर्णय येत्या सहा नोव्हेंबरला महेश साळुंखे घेणार आहेत.

थोडे नवीन जरा जुने