आ.महेश बालदी यांना परप्रांतीय म्हणणार्‍यांवररुपेशदादा धुमाळ यांचापलटवार

आ.महेश बालदी यांना परप्रांतीय म्हणणार्‍यांवररुपेशदादा धुमाळ यांचापलटवार
नवी मुंबईचे विमानतळ दि.बा. पाटलांच्या नावानेच ओळखले जाईल-रुपेशदादा धुमाळ
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा चिटणीस रुपेशदादा धुमाळ यांनी समाजकार्यासोबतचआता राजकारणाची कास धरली आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी नुकताच निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी भव्यदिव्य शक्तिप्रदर्शन करत सभा घेण्यात आली. त्यानंतरपत्रकार परिषद घेतरुपेशदादा धुमाळ यांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केली आहे.उरणचे आमदार महेश बालदी हे परप्रांतीय असल्याचे हिणवणार्‍यांवर रुपेशदादा धुमाळ यांनी चांगलाच पलटवार केलाय. उरणमध्ये विशिष्ट जातीच्या नेत्यानेच नेतृत्व करावे हे बंधनकारक नाही. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे ते जाती-धर्माचे मुद्दे उचलत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.
2014 च्या निवडणुकीत आगरी-कोळी-कराडी संघाने विवेक पाटीलांना पाठिंबा दिला. त्यांनी आमच्या समाजातील लोकांची माती केली. मात्र महेश बालदी यांनी आमच्या समाजाचे अस्तित्व उरणमध्ये जोपासले आणि तरुणांना रोजगार मिळवून दिला, त्यामुळेच त्यांना जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी रुपेशदादा धुमाळ यांनी सांगितले.भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकनेतेदिबा. पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण समाजासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.विमानतळावर हजारो नोकर्‍या उपलब्ध होत आहेत. स्थानिकांना नोकर्‍या देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येथे 100 टक्के प्राधान्य स्थानिक भूमिपुत्रांना मिळणार असून यासाठी आमदार महेश बालदी यांनी मोलाचं काम केल्याचं त्यांनी सांगितलं.
विमानतळावर आता झालेल्या नुकत्याच नोकर भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना नोकर्‍या मिळाल्या आहेत. परिसरातील युवकांनाही नोकर्‍या मिळाव्यात, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.भाजपचे कार्यकर्ते उरणच्या तळागाळात पोहचलेत. आमदार बालदी यांनी केलेली विकासकामे आगरी-कोळी-कराडी समाजाच्या लोकांसाठीच केली आहेत असेही रुपेशदादा धुमाळ त्यांनी स्पष्ट केले.राजकारणात एकनिष्ठता हवी त्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या आदर्शावर आपण कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.पुढील काही दिवसात नवी मुंबईचे विमानतळ दि.बा. पाटलांच्या नावानेच ओळखले जाईल, असा विश्‍वास रुपेशदादा धुमाळ यांनी यावेळीवर्तवला.महेश बालदी यांनी हजारो करोडोंची विकास कामे उरणमध्ये केली आहेत. त्यामुळे विकास करायचा असेल तर प्रचंड बहुमताने महेश बालदी यांनाच निवडून द्या, असं आवाहनरुपेशदादा धुमाळ यांनीउरणच्या जनतेला केलं आहे.
थोडे नवीन जरा जुने