पनवेल/प्रतिनिधी: उरणची जागा आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा असा दावा शेकापचे उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केला आहे.
कार्यकर्ते ही शेकापची ताकद आहे. त्यांच्या निष्ठेने पक्ष वाढत असतो.
आम्ही त्यांच्या इच्छेनुसार चालतो. या ठिकाणी स्थानिकांना कमी लेखण्याचे काम काही जण करत असतील तर त्यांना जागा दाखवून देण्यासाठी आम्हाला लढणे आवश्यक आहे
. शेकाप हा नेहमी संघर्ष करून यश संपादन करत असतो. पक्षाला चळवळीचा वारसा आहे. एकनिष्ठेचा लाल बावटा हाती घेऊन कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत.स्थानिकांना रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.त्याला प्रत्यक्षरूप येण्यासाठी ही निवडणूक लढणे आवश्यक आहे आणि ती जिंकणे सुद्धा अत्यावश्यक आहे असे मत शेकापचे उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी व्यक्त करून राजकीय वावड्यांना पूर्ण विराम दिला.
धन्यवाद.
संपादक : गौरव जहागीरदार
9967447111
Tags
उरण