पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः भारतीय सैन्यदलातील शौर्यचक्र विजेते युद्धवीर मधुसूदन सुर्वे आणि लेफ्टनंट कर्नल संतोष मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शांतीवन येथील कुष्ठरोगी आणि वृद्ध बांधवांसमवेत सहभोजन, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, महिलांना साडी वाटप करून संवेदना फाउंडेशनतर्फे दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख, माजी पोलीस निरीक्षक अविनाश सोनकर, कस्टम अधिकारी सत्यवान रेडकर, कुष्ठरोग समितीचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ढोरे, संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद चाळके, अॅड. रंजना खोचरे, गायक किशोर गवांदे, पोलीस निरीक्षक रवींद्र दुशारेकर, सिने अभिनेत्री ईश्वरी शेट्ये, अभिनेता मितेश आगणे, सहारा अकादमीचे एस पवार, शांतीवनचे सीईओ नंदवुमार उरणकर, समाजसेवक एकनाथ भिसे, राजेन्द्र वोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शौर्यचक्र विजेते युद्धवीर मधुसूदन सुर्वे आणि लेफ्टनंट कर्नल संतोष मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार श्रीकांत जाधव यांनी केले. करुणेश्वर वृद्ध आश्रमातील बांधवांना भेट देऊन त्यांच्या समवेत गाणी सादर करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष अमोल खैरे, अशोक राजपुरोहित, कमलेश कुबल, कुष्ठरोग समितीचे संतोष ढोरे, ईश्वर, करुणा ढोरे यांनी अथक परिश्रम घेतले. सदर उपक्रमासाठी मुंबईसह दापोली मंडणगड आणि रत्नागिरी येथून मोठ्या संख्येने संवेदना फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
पनवेल