केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांच्या पनवेल येथील संग्राम निवासस्थानी आज सदिच्छा भेट देत दिबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, दिबासाहेबांचे सुपुत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक अनिल भगत, जगदीश गायकर, श्रीनंद पटवर्धन, आदी उपस्थित होते.
Tags
पनवेल