पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन पनवेल कोळीवाडा येथील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी आज (दि. १५) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करून पक्षात प्रवेश देण्यात आला. या प्रवेशामुळे शेकापला शहरात आणखी एक झटका बसला आहे.
यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, शहर सरचिटणीस अमित ओझे, रुपेश नागवेकर, विनायक मुंबईकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, हारुशेठ कोळी, रोशन ठाकूर, पवन सोनी, आदी उपस्थित होते. शहरातील कोळीवाडा मधील शेकापचे आकाश भगत, राहुल पाटील, केतन भोईर, राहुल शेलार, अरुण शेलार, रवी भोईर, मछिंद्र भोईर, अरुण भोईर, किरण भोईर, विवेक शेलार यांनी यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. आज कोळीवाड्यातील या प्रवेशामुळे ताकद वाढली असून तुम्हाला पक्षात मानसन्मान दिला जाईल अशी ग्वाही शहर अध्यक्ष अनिल भगत यांनी दिली. आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने सिंहाचा वाट उचलावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Tags
पनवेल