महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार लीना गरड यांच्या प्रचाराची सुरूवात गगनगिरी महाराज यांच्या मंदिरातून


पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः आज पनवेल विधानसभा 188 निवडणूक 2024 महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. लीना अर्जुन गरड यांच्या प्रचाराची शहरातील सुरुवात कामोठे शहर शाखा गगनगिरी महाराज यांच्या मंदिरात शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली तसेच कामोठे शहरात प्रचार पत्रक वाटप करण्यात आली.
यावेळी जिल्हा समन्वयक व निरीक्षक अनिल चव्हाण, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत, महानगर समन्वयक दिपक घरत, तालुका प्रमुख संदीप तांडेल, शहर प्रमुख रामदास गोवारी, युवासेना सहसचिव अवचित राउत, जिल्हाधिकारी पराग मोहिते, महेश भिसे, सागर पाटील, मधू पाटील, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटिका सौ. अनिता डांगरकर, उपतालुका संघटिका सौ. मिना सदरे,  प्रवक्त्या सौ. सुवर्णा वाळूंज, शहर संघटिका सौ. संगीता राऊत, आजी, माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने