पूजलेल्या 'लक्ष्मी' वरच चोराने मारला डल्ला



लक्ष्मी पूजन केल्यानंतर पूजेसाठी मांडलेला ऐवज चोराने पळवल्याची घटना घणसोलीत घडली. रात्रीच्या घराचा दरवाजा उघडा ठेवला असता चोराने डल्ला मारला. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घणसोलीत राहणाऱ्या सोमनाथ गोपाळे यांनी राहत्या घरात लक्ष्मीपूजन केले. 


पूजेत दागिने व रोकड आदी ऐवज मांडला होता. मात्र, रात्री झोपताना घराचा दरवाजा उघडा राहिला, संधी साधत चोर घरात शिरले, पूजनात मांडलेला सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोराने पळवले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोपाळे यांनी रबाळे पोलिसांत तक्रार केली.
थोडे नवीन जरा जुने