कोयता बाळगणाऱ्यावर कारवाई


 

कोयता घेऊन फिरणाऱ्या एकावर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. ओमप्रकाश गौड असे त्याचे नाव असून, तो नेरूळ एमआयडीसी परिसरात रविवारी रात्री मिळून आला

. परिसरात पोलिसांची गस्त सुरू असताना ओमप्रकाश याच्या हालचालीवर संशय आल्याने पोलिसांनी झडती घेतली असता कोयता। आढळला. तातडीने त्याला अटक करून कोयता जप्त करण्यात आला. कोयता घेऊन आरोपी का फिरत होता याबाबतची तपासणी पोलीस करत आहेत.
थोडे नवीन जरा जुने