लोकसभा निवडणुकीदरम्यान तुर्भे एमआयडीसी परिसरातून हद्दपार गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केलेली असतानाही तो शहरात मिळून आला.
तुर्भे एमआयडीसी पोलिसांकडून आंबेडकर नगर व परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. यादरम्यान हद्दपार केलेला एक गुन्हेगार परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून गस्ती पथकाने अस्लम ख्वाजामिया शेख उर्फ बाबू काल्या (२४) याला अटक केली.
Tags
पनवेल