जय गोपीनाथ प्रतिष्ठानचा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा


पनवेल विधानसभेचे उमेदवार आ प्रशांत ठाकूर यांना जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पत्र देऊन बिनशर्त पाठिंबा दिला. पनवेल परिसरातील सर्व वंजारी समाज बांधव व जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्तृत्ववान व कर्तबगार आमदार मा प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला.
 यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाष आंधळे,  मार्गदर्शक बबन बारगजे, सचिव, हनुमंत विघ्ने, सहसचिव, विट्ठल घोळवे, ज्येष्ठनागरिक प्रमुख, मोहन केदार, प्रदेश उपाध्यक्ष विनोद खेडकर, रायगड जिल्हाध्यक्ष, तुकाराम केदार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अंकुश खरमाटे, स्वप्नील राख लक्ष्मण जायभाये दिलीप गर्जे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने