महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. दिवाळीनंतर 4 नोव्हेंबरपासून प्रचारात जोर वाढणार आहे. पालघर जिल्ह्यात मात्र काही अनपेक्षित घडामोडी घडत आहेत.
पालघर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमित घोडा गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी दोन दिवसांपूर्वीच बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती, ज्यामुळे महायुतीमध्ये चिंता वाढली आहे.
Tags
मुंबई